कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी. एम. किसान ॲपद्वारे ओटीपी लाभार्थ्यांना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. ३१ ऑगस्टपर्यंत करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीत ई-केवायसी प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पी. एम किसान सन्मान निधीचा या पुढील लाभ दिला जाणार नाही, तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी या  निर्देशाप्रमाणे ई-केवायसी दि. ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी, असे नमूद केले आहे.