Breaking News

 

 

विजय मल्ल्याला लंडन कोर्टाचा दणका : प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली…

लंडन (वृत्तसंस्था) : भारतीय बँकांना हजारो कोटींना गंडा घालून पळून गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्या याला मोठा दणका बसला आहे. लंडनमधील न्यायालयात मल्ल्याने दाखल केलेली प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली आली आहे. त्यामुळे लवकरच मल्ल्याला भारतात आणणे शक्य होणार आहे.

देशभरातल्या बँकांचं जवळपास ९ हजार कोटींचं कर्ज त्याने बुडवलं आहे. विजय मल्ल्याचं सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिनिस्टर कोर्टात गेली काही दिवस सुनावणी सुरू होती. भारतात आल्यावर कायद्याच्या कचाट्यातून आपली सुटका होणार नाही याची विजय मल्ल्याला भीती वाटते. अनेक दिवसांपासून माल्ल्याला भारतात आणण्यासाठी तपास यंत्रणा जंग जंग पछाडत होत्या. लंडन कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे भारतीय यंत्रणांना मोठे यश आल्याचे मानले जात आहे.

सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहे. कोर्टाचा निकाल सकारात्मक आला तर मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम हे पथक करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा