Breaking News

 

 

उद्योजक बनून प्रगतशील भारत बनवा : डॉ. अरविंद खांडेपारकर 

महागाव (प्रतिनिधी) : शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी नोकरी, व्यवसायाच्या मागे न लागता आपल्याकडे असलेल्या ज्ञान व कौशल्याच्या जोरावर स्वतःच उद्योजक होऊन  प्रगतशील भारत घडवण्यात योगदान द्यावे तसेच उद्योग उभारण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील शासनाकडून अनुदान मिळते याचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन गोवा येथील सेंच्युअर फार्मचे व्यवस्थापक अरविंद खांडेपारकर  यांनी केले. ते महागाव (ता. गडहिंग्लज)  येथील संत गजानन फार्मसी  महाविद्यालयातर्फे आयोजित  औषध निर्माण कंपनीतील नवीन संशोधन कार्यपद्धती व मुलाखतीचे तंत्र  या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात बोलत होते.

यामध्ये डॉ. एन. आर. जाधव, डॉ. सचिन कुंभोजे, प्राचार्य एस. जी. किल्लेदार यांसह औषध निर्माण  क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला. फार्मा टॅलेंट हंट अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत विविध राज्यातील २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातून पोस्टरसाठी कु. अंकिता होगले, कु. पंकज माने (संतकृपा फार्मसी, घोगाव) यांनी प्रथम, कु. श्रुती सुंठणकर, कु. प्रेरणा आजगेकर (संत गजानन फार्मसी, महागाव) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. सुमीत सेलोट व कु. किरण माळी (कराड फार्मसी) यांनी प्रथम,  संभाजी मासाळ व सूरज कुंद्रे (भारती विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून  गौरवण्यात आले. डॉ. जे. एस. मुल्ला, डॉ. ए. ए. भागवत, डॉ. आसिफ कारीगर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. संस्थाध्यक्ष आण्णासाहेब चव्हाण, डॉ.  यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, प्रा. स्वप्नील हराळे, प्रा. अभिनंदन आलमन, प्रा.  पंकज चौगुले यांसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे