Breaking News

 

 

मंडलिक खासदार झाल्याशिवाय महाडिकांची ‘गोकुळ’मधून हकालपट्टी होणार नाही : प्रकाश चव्हाण

गडहिंग्लज ( प्रतिनिधी) : लाखो दूध उत्पादकांची अर्थवाहिनी असणारा गोकुळ दुध संघ मल्टीस्टेटच्या  नावाखाली महाडिकांना स्वतःच्या घशात घालायचा आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होईल. प्रा. संजय मंडलिक खासदार झाल्याशिवाय गोकुळमधून महाडिकांची  हकालपट्टी होणार नाही, अशी घणाघाती टीका ‘गोड साखर’चे माजी उपाध्यक्ष व गडहिंग्लज तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण यांनी केली. सेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी गडहिंग्लज विभागातील हिटणी, मुत्नाळ, निलजी, हेब्बाळ, हासुरचंपू, दुंडगे, जरळी, मुगळी, नूल, चन्नेकुप्पी, भडगाव व हरळी या गावांचा प्रचार दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला.

प्रकाश चव्हाण म्हणाले की, आपल्या घरातच अनेक  पक्षांची पदे मिळवून  झुंडशाही , दहशत आणि पैशाच्या जीवावर स्वतःच्या कुटूंबाचा उद्धार करणाऱ्या  महाडिकांना जिल्ह्यातून घालवल्या शिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही. खासदार धनंजय महाडिक यांना ग्रामीण भागाशी काहीही देणेघेणे नाही. मोदींचे हात बळकट करण्यासाठी संजय मंडलिक यांना चंदगड विभागातून  मताधिक्य देणार, असा विश्वास  यांनी व्यक्त केला. पं. स. सभापती जयश्री तेली म्हणाल्या की, गत निवडणुकीत आम्ही महाडिकांचा जिवापाड प्रचार केला. निवडून आल्यानंतर पाच  वर्षात ते गावात  फिरकले नाहीत. आता लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर दहा लाख रुपयांच्या निधीची घोषणा करून त्यांनी गावात एन्ट्री केली. पाच वर्ष निष्क्रिय राहिलेल्या महाडिकांना आता संधी नाही.

प्रा. संजय मंडलिक म्हणाले की, महाडिक कंपूने जिल्ह्यात नावाजलेल्या बँका मोडीत काढल्या. आता गोकुळ मोडायचा डाव आहे. तो हाणून पाडण्यासाठी महाडिक हटावसाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन नेते व कार्यकर्ते काम करत आहेत. तर नवतरुणांची मते निर्णायक आहेत. सेना-भाजपने पाच वर्षात मोठी विकास कामे झाली आहेत. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाडिकांची झुंडशाही मोडून काढा.

प्रा. मंडलिक यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्राम सिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर, जि. प. सदस्य हेमंत कोलेकर, आर.पी.आयचे तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, शहराध्यक्ष मोहन बारामती, सोमगोंड आरबोळे, आप्पासाहेब पाटील, श्रीरंग चौगुले, नगरसेवक नरेंद्र भद्रापुरे, बसवराज आरगुळी यांच्यासह सेना-भाजपचे प्रमुख पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते.

747 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *