Breaking News

 

 

विरोधकांना जनता मतपेटीतून उत्तर देईल : आ. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) :  कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथे  खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, युवराज पाटील, भैया माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. मुश्रीफांनी खोटे बोल पण रेटून बोल अशी मनोवृत्ती विरोधकांची असल्याचे सांगितले. त्यांची विकासांच्या योजना म्हणजे निव्वळ लोणकढीची थाप असल्याची टिका केली.

आ. मुश्रीफ म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर उगवायचं, जनतेत मिसळायचं आणि निवडणुका झाल्या की पाच वर्षे नॉटरिचेबल राहायचे ही विरोधकांची सवय जनतेला चांगलीच ठाऊक झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देईल, असा टोलाही आ. मुश्रीफांनी लगावला.

यावेळी राजश्री माने, रणजीत कांबळे, अनिल पाटील, कसबा सांगाव ग्रा.पं.चे सदस्य, अविनाश मगदूम, राहुल हेरवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, विठ्ठल चव्हाण, मारुती पाटील, प्रकाश शिनगारे, रावसाहेब मगदूम,जालंदर लगारे, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे