Breaking News

 

 

काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेला देशोधडीला लावले : आ.राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ६५ वर्षे सत्ता भोगून जनतेला देशोधडीला काँग्रेस–राष्ट्रवादीने लावले आहे. त्यांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे देशाचा हवा तसा विकास झाला नाही. त्यामुळे देशात युतीचे शासन येणे काळाची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करा, असे आवाहन आ. राजेश क्षीरसागर यांनी आज (सोमवार) केले. ते प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ रंकाळा टॉवर, गंगावेश परिसरात प्रचार फेरीवेळी बोलत होते.

आज रंकाळा टॉवर येथून प्रा.संजय मंडलिक, आ. क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रचार फेरी काढली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. फेरीत प्रा.संजय मंडलिकांना मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. ही प्रचार फेरी रंकाळावेश स्टँड मार्गे गंगावेश चौक, धोत्री गल्ली, दुधाळी परिसर, रंकाळा मार्केट मार्गे रंकाळा टॉवर अशी काढण्यात आली.

आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहत कोल्हापूर जिल्हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाच्या दृष्ठीने विकास होणे गरजेचे होते. परंतु, गेल्या ५ वर्षात जिल्ह्याच्या विकासाला खो बसला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रा. संजय मंडलिक हेच एकमेव पर्याय असून, कोल्हापूर शहरातील सुजाण जनता प्रा. मंडलिकांच्या पाठीशी ठाम उभी असल्याने, त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी युतीचे धनाजी कारंडे, प्रवीण लिमकर, ओंकार डकरे, हरिभाऊ भोसले, राजेंद्र कदम, योगेश मांडरेकर, संजय भांडवले, संतोष कांदेकर, जॉनी घाडगे, उदय निगडे, प्रशांत पोवार, सागर खापणे, गोविंद जाधव, राजू चव्हाण, पिलू निंबाळकर, शेखर मोरे, अजित मोरे यांच्यासहीत मान्यवर, शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे