Breaking News

 

 

राजारामपुरीत दोन लाखांचे विदेशी मद्य जप्त : एकास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत शहरात विदेशी मद्य पाण्याप्रमाणे वाहू लागले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल (रविवार) दुपारी राजारामपुरी सारख्या उच्चभ्रू भागातून सुमारे २ लाख रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य पकडल्याची माहिती विभागाचे पोलीस अधिक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे शहरात ठिकाणी तपासणी सुरू आहे. दुचाकी वाहनावरून गोवा बनावटीचे मद्याचे २३ बॉक्स एकाकडून हस्तगत करण्यात आले. दुचाकीवरुन (एमएच ०९ सीजी ५२१८) गोणपाटात गुंडाळलेले हे मद्य नारायण गणपत भुते (रा. शाहु मिल कॉलनी) हा घेवून जात होता. त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता शाहु मिल कॉ़लनीतील घरात गोवा बनावटीचे विदेशी मद्य साठवून ठेवले असल्याची माहिती त्याने दिली.

त्यानुसार पांजरपोळ परिसरात एका पथकाद्वारे पाळत ठेवून दुपारी साडेतीनच्या सुमारास भुते हा त्याच्या दुचाकीवरून मद्याचे बॉक्स गोणपाटात झाकून घेऊन जात होता. हे मद्य जप्त करण्यात आले आहे. ते कोणासाठी आणले याचा तपास सुरू आहे.

या कारवाईत भरारी पथकातील निरीक्षक संभाजी बर्गे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळे, जय शिनगारे, आदींनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा