Breaking News

 

 

दोघा युवकांच्या प्रसंगावधानाने वाचले युवक काँग्रेसचे सरचिटणीसाचे प्राण !

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथील कासारी नदीत पोहायला गेलेल्या जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस अर्जुन काटकर यांना बुडताना दोघा तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण वाचवले. रविवारी सकाळी नऊच्या दरम्यान भिवाच्या धरणाजवळ ही घटना घडली. कृष्णात  खोत व अमोल काटकर (रा.  काऊरवाडी, ता. पन्हाळा)  अशी त्या  तरुणांची नावे आहेत. त्यांच्या या धाडसाचे परिसरातील जनतेतून कौतुक होत आहे.

काटकर यांना बेशुद्ध अवस्थेत बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पन्हाळा पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पाटील व बाजारभोगावचे सरपंच नितीन पाटील यांनी बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने भेट दिली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आपण सुट्टीवर असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे