Breaking News

 

 

खा. महाडिकांना मौजे सांगाव, सिद्धनेर्लीतून मताधिक्य देणार : युवराज पाटील

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील मौजे सांगाव आणि सिद्धनेर्ली इथे खा. महाडिकांच्या प्रचारार्थ मेळावे झाले. या मेळाव्यांना आ. हसन मुश्रीफ, खा. धनंजय महाडिक, युवराज पाटील, भैय्या माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मौजे सांगाव आणि सिद्धनेर्लीतून खा. महाडिकांना मतधिक्य देणार असल्याचे सांगितले.

युवराज पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे सातत्याने ज्यांनी लोकसंपर्क ठेवला, विकासाची अनेक कामे केली त्यांच्यावर नॉटरिचेबल उमेदवारांनी टीका करणं म्हणजे काजव्यांने सूर्यावर टीका करण्यासारखे असल्याचे सांगितले.

यावेळी अनिल पाटील, राजश्री माने,प्रवीण भोसले, कृष्णात पाटील, स्वाती पाटील, विजयसिंह पाटील, बाबासाहेब पाटील भुयेकर, आनंदा पसारे, रमेश तोडकर, बाबासाहेब नाईक, के. बी. पाटील, बाळासाहेब तुरंबे,तानाजी पाटील, अरुण पाटील यांच्यासहीत मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

294 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा