Breaking News

 

 

भादोलेत बाकडे अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू…

पेठ वडगांव (प्रतिनिधी) : भादोले (ता. हातकणंगले) येथील सिद्धी दीपक माने (वय ५) या चिमुरडीचा बिरदेव मंदिर परिसरात खेळताना तिच्या अंगावर बाकडे पडले. त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

हातकणंगले तालूक्यातील भादोले येथे बिरदेव मंदिर परिसरात बसण्यासाठी ठेवलेल्या बाकड्यावर सिद्धी खेळत होती. खेळताना तिच्या अंगावर बाकडे पडून तिच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी खाजगी वाहनातून मुलीला पेठ वडगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र या चिमुरडीचा वाटेतच मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेने भादोले, वडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे