Breaking News

 

 

निवेदिता माने यांनी घेतली विनय कोरे यांची भेट

कोतोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रचाराला वेग आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाआघाडीचे उमेदवार खा. राजू शेट्टी यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खा. निवेदिता माने यांनी आज (रविवार) जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांची भेट घेऊन चर्चा केली.

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे नेते धैर्यशील माने यांनी काही दिवसांपूर्वी संक्रांतीदिवशी मुहूर्तावर विनयराव कोरे – सावकर यांची भेट घेतली होती. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाची चांगली ताकद आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांचेकडून कोरे यांचा पराभव झाला.

मतदानाला १५ दिवस राहिले असताना अद्याप कोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्याने महायुतीची धाकधूक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज निवेदिता माने यांनी कोरे यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. दोघांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही, तरी माने यांनी स्वतःहून कोरे यांची भेट घेऊन आपल्या मुलाला पाठिंबा देण्याविषयी गळ घातल्याचे वृत्त आहे. या वेळी संजय दळवी, विजय चौगुले उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे