Breaking News

 

 

महाराष्ट्र क्रांती सेनेची निवडणुकीतून माघार : शिवसेना-भाजपला विनाअट पाठिंबा

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा समाजाचे नेते सुरेशदादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी स्थापन केलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप महायुतीला विनाअट पाठिंबा देत असल्याचे पाटील यांनी आज (रविवार) मुंबईत झालेल्या मेळाव्यात जाहीर केले.

सुरेशदादा पाटील अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेने राज्यात १५ जागांवर उमेदवार उभे केले होते. सुरेश दादा पाटील हे हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार आहेत. मात्र सेना-भाजपच्या नेत्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून युतीला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार मुंबईत झालेय एका मेळाव्यात पाटील यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेचा महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्याबाबतचे पत्र त्यांनी आज शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचेकडे सुपूर्द केले. महाराष्ट्र क्रांती सेना जनतेचे आणि राष्ट्राचे व्यापक हित लक्षात घेऊन भाजप-सेना महायुतीला विनाअट पाठिंबा देत आहे. आमचे सर्व उमेदवार सोमवारी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतील, असे पत्रात म्हटले आहे

महाराष्ट्र क्रांती सेना यावेळी आ. प्रवीण दरेकर, क्रांती सेनेचे प्रमुख पदाधिकारी, युतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा