Breaking News

 

 

मंडलिकांना भुदरगडमधून मताधिक्य देणार : के. जी. नांदेकर

गारगोटी (प्रतिनीधी) : युती शासनाने आपल्या कार्यकाळात कामाचा डोंगर उभा केला आहे. विकास कामांमुळे जनता युती सरकारला आपले सरकार मानत आहे. स्वर्गीय खा. सदाशिवराव मंडलीक यांची कामे तर प्रा. मंडलीकांनी ठेवलेल्या जनसंपर्कावर यांचा विजय निश्चित आहे. या विजयामध्ये भुदरगड तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य त्यांना देणार असल्याच्या विश्वास बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक के.जी.नांदेकर यांनी केले. ते गारगोटी (ता.भुदरगड) येथे प्रा.मंडलिकांच्या  प्रचार कार्यालयाच्या उदघाटनावेळी बोलत होते. यावेळी बाबा देसाई, आ. प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते.

आ.आबिटकर म्हणाले, युती शासनाने पाच वर्षांत अनेक मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रस्ते, वीज व पाणी याला प्राधान्य दिले आहे. विकासाची गंगा तळागाळापर्यंत पोहचवली आहे. याच विकासाच्या कामांवर महायुतीचे उमेदवार प्रा.मंडलिक हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, बिद्री माजी संचालक दत्ताजीराव उगले, जीवन प्राधिकरण महामंडळाचे संचालक प्रविणसिंह सावंत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, भाजपा तालुका प्रमुख नाथाजी पाटील, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे, पं.स. सदस्य सुनिल निंबाळकर, सरपंच धनाजीराव खोत, अलखेश कांदळकर, जयवंतराव चोरगे, तात्या पाटील यांच्यासह शिवसेना-भाजपा व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे