Breaking News

 

 

आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरीला कोल्हापुरात अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पॅरोलवर सुटल्यावर फरार झालेला आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आज (रविवार) पहाटेच्या सुमारास कोल्हापुरातील एका हॉटेलवर छापा टाकून शाहूपुरी पोलिसांनी नागोरीच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि पथकाने केली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात कलम १४२ नुसार नागोरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष नागोरी हा कारागृहातून सुट्टीवर बाहेर गेल्यानंतर फरार झाला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी चंदगड येथून चार पिस्तुलासह काडतुसे जप्त करून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी मनीष नागोरी यानेच त्यांना हा शस्त्रसाठा पुरविल्याचे  प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तो उत्तरप्रदेश, बिहार आणि गोवा राज्यातील गुन्हेगारांच्या संपर्कात होता. त्याने परराज्यातून पिस्तुल आणून विकण्याचा छुपा व्यवसाय सुरू केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *