Breaking News

 

 

कमलनाथ यांच्या ‘पीए’च्या घरावर ‘आयकर’चा छापा : ९ कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आयकर विभागाने देशभरात ५० ठिकाणी धाडी टाकल्या. शनिवारी मध्यरात्रीपासून या धाडसत्राला सुरुवात झाली. प्रथम मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या इंदूरमधील घरावर शनिवारी रात्री तीन वाजता दिल्ली आयकर विभागाने छापा टाकला. यामुळे राज्यात खळबळ उडाली.

प्रवीण कक्कड हे माजी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय, रतलाम जाभुआ मतदारसंघातील खासदार कांतिलाल भुरिया यांच्याशी कक्कड यांचे निकटचे संबंध असल्याचे सांगितले जाते. प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झाडाझडती घेत आहेत. आतापर्यंत कक्कड यांच्या घरातून ९ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले होते.

त्याचप्रमाणे मध्य प्रदेशसह देशभरात ५० ठिकाणी आयकर खात्याने धाडी टाकल्या. यामध्ये अमिरा समूह, मोझर बेयर यांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. याशिवाय भुला, गोवा आणि अन्य ३५ ठिकाणांवर आयकर खात्याच्या विभागाकडून तपास सुरु आहे. या कारवाईत आयकर विभागाचे तब्बल ३०० अधिकारी सहभागी असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे