गडहिंग्लजचा फुटबॉलपटू सौरभ पाटीलची राज्य संघात निवड…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनचा खेळाडू सौरभ पाटील याची संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. लुधियाना (पंजाब) येथे होणाऱ्या मुख्य स्पर्धेसाठी मुंबईतून रवाना झाला. संतोष ट्रॉफी खेळणारा सौरभ हा गडहिंग्लज युनायटेडचा खेळाडू दुसरा खेळाडू आहे.

सौरभने १८ वर्षाखालील इंडियन फुटबॉल लीग (आयलीग) फुटबॉल स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे. जीपीएल स्पर्धेत त्यांने स्पर्धावीराचा बहुमान पटकाविला आहे. नुकत्याच आसाम येथील सीएम गोल्ड कप आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धेत नेपाळ संघाविरुद्ध गोल नोंदविला. त्याला प्रशिक्षक दीपक कुपणावर यांचे मार्गदर्शन मिळाले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर आणि संचालक मंडळाचे त्याला प्रोत्साहन मिळाले.

यापूर्वी गडहिंग्लज युनायटेडचा विक्रम पाटीलने तामिळनाकडून सलग चार वर्षे संतोष ट्रॉफी स्पर्धेत खेळला आहे. सौरभ पाटील सध्या गोव्याचा साळगांवकर संघातून खेळतो आहे. मंगळवार (दि.९) रोजी कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्राचा पहिला सामना होणार आहे. तर १९ एप्रिलला उपांत्य तर २१ एप्रिलला अंतिम सामना होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram