कुंभोज (प्रतिनिधी) : कायद्याच्या चौकटीत राहून यंदाचा गणेशोत्सव शांततेने साजरा करण्याचे आवाहन हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केले. त्या हातकणंगले येथे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव आढावा बैठकीत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.

यावेळी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव असावा, पारंपरिक वाद्याचा वापर करावा, एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी,  वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने गणेश मंडप उभा करू नये आणि मिरवणूक नसावी. हातकणगले पोलीस उपनिरीक्षक यशंवत उपराटे, शिरोलीच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती चव्हाण, हातकणंगले नगराध्यक्ष अरुण जानवेकर, हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित  होते.