Breaking News

 

 

खड्ड्यात जायला हा देश म्हणजे मनसे नव्हे : विनोद तावडे

मुंबई (प्रतिनिधी)  : हा देश सव्वाशे कोटी लोकसंख्येचा आहे. हा काही खेळ नाही. खड्ड्यात जायला तो काय मनसे पक्ष आहे का, असा उपरोधिक सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. शनिवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली आणि राहुल गांधी यांना पंतप्रधान करा. मग देश चालेल तरी नाही तर खडड्यात तरी जाईल, असे विधान केले होते. या विधानावर आज (रविवार) तावडे यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली.

ज्या संजय निरुपम यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लुच्चा म्हणून हिणवले त्याच काँग्रेसला आणि निरुपम यांना मतदान करण्याची वेळ आज मनसेच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. हा कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे.  कालच्या भाषणासाठी राज ठाकरेंनी जसे कष्ट घेतले, ते आधी घेतले असते तर आज दुसऱ्यासाठी सभा घेण्याची वेळ आली नसती. स्वत:चे बंद पडलेले इंजिन दुसऱ्यारीकडं जोडून चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत.  राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील,’ असा टोलाही तावडे यांनी हाणला.

शरद पवार, भुजबळ, अजित पवार यांच्याविरुध्द राज ठाकरे आधी काय बोलले होते हे आठवून बघा, असे सांगून तावडे म्हणाले, भारतात लोकशाही व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कौन्सिलच्या सर्वोच्च परिषदेवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का? जगातील सर्व देश मूर्ख आणि तुम्हीच खरे आहात का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन चालणाऱ्यांनी हा नको म्हणून दुसऱ्याला मतं द्या, असं म्हणणं बरोबर नाही. राज यांनी कालच्या मेळाव्यात जी भाषा वापरली ती मराठी माणसाला आवडत नाही. त्यांचं असं बोलणं निवडणूक आचारसंहितेत बसत नाही,’ असं तावडे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा