Breaking News

 

 

भावी पिढीला संस्कृतीची ओळख होण्यासाठीच दिनदर्शिका तयार केली : विद्यानृसिंह भारती स्वामी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या उज्ज्वल भारतीय संस्कृतीची ओळख पुढील पिढीला व्हावी, या उद्देशाने दिनदर्शिका तयार केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी दिली. आज (शनिवार) येथील जगदगुरू शंकराचार्य पीठ, करवीरच्यावतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते.  

ते म्हणाले की, आपल्यापैकी कित्येकांना पंचांगाची माहिती असत नाही. याचबरोबर आपल्याकडे प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानला जातो. मात्र त्याचे वैशिष्ट्य माहीत नसते. आपणाला फक्त राम नवरात्र आणि दुर्गा नवरात्र असे माहीत आहेत पण प्रत्येक महिन्यात नवरात्र आहे. ज्याचा मूळ उद्देश वैयक्तिक उपासना घडावी, असा आहे. अशा कित्येक गोष्टींबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या दिनदर्शिकेतून केला आहे.

यावेळी स्वामीजींच्या हस्ते पीठाच्या ‘ज्ञान’ या त्रैमासिकाचे प्रकाशनही करण्यात आले. सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी सुरेश कुलकर्णी, रामकृष्ण देशपांडे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग