कोल्हापूर (प्रतिनिधी) : गंगावेस येथील श्रीराम नाश्ता सेंटरचे मालक  यांनी रस्त्यात सापडलेले ३० हजार रुपये प्रामाणिकपणे परत केले. यानिमित्त कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ‘आप’चे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी, प्रचार समिती सदस्य आभिजित कांबळे, विभाग प्रमुख राज कोरगावकर, विभागप्रमुख रवींद्र राऊत, बसवराज हद्दिमनी, अमरसिंह दळवी उपस्थित होते.