Breaking News

 

 

चंदगडमध्ये चार बेकायदा पिस्तुल हस्तगत : दोघांना अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोघांकडून देशी बनावटीचे चार गावठी पिस्तुल, मॅगेझीन व आठ जिवंत काडतुसे असा सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी आज (शनिवार) जप्त केला आहे. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

पोलीस नाईक रणजीत पाटील यांना बोंर्जुडे (ता.चंदगड) बसस्थानक परिसरात दोघेजण देशी बनावटीचे पिस्तुल व काडतुसे घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार याठिकाणी छापा टाकून विकी धोडिंबा नाईक (वय २८, रा. अमरोळी, ता.चंदगड) आणि सुनिल भिकाजी घाटगे (वय २६, रा. लक्षतीर्थ, कोल्हापूर) यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांची शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

त्यांनी ही शस्त्रे कोठुन व कोणाकडून आणली तसेच यापूर्वी अशा बेकायदेशीर शस्त्रे रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का, या संबंधी तपास सुरु आहे. दोन्हीही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक सतिश शिंदे, पोलीस उपनिरिक्षक अमोल माळी, रणजीत तिप्पे, सत्यराज घोले, महेश कोरे, वैभव दड्डीकर, शहनाज कनवाडे, रणजीत पाटील, विजय तळस्कर, ज्ञानेश्वर बांगर, रविराज कोळी आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग