Breaking News

 

 

ज्यांना मुरगूडचा विकास जमला नाही ते जिल्ह्याचा काय विकास करणार ? : रणजीतसिंह पाटील

मुरगूड (प्रतिनिधी) : मागील अनेक वर्षे मुरगूडची सत्ता हातात असूनही ज्यांना मुरगूडचा विकास करता आला नाही, त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या गप्पा करणं हास्यास्पद आहे. ते जिल्ह्याचा काय विकास करणार, असा सवाल करीत गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी सेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर टीका केली.

कागल तालुक्यातील मुरगूड येथे खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यास ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक रणजीतसिंह पाटील, खा. धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. रणजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात केंद्रातील मोदी सरकारसह प्रा. संजय मंडलिक यांच्यावर हल्लाबोल केला.

या वेळी गजानन पाटील, एकनाथ कळमकर, मलगोंड हेगाजे,बाळासाहेब पाटील,नानासाहेब पाटील, रघुनाथ कुंभार, दगडू शेणवी, दत्तात्रय हासूरकर, प्रकाश भोसले, बजरंग सोनुले, मधुकर करडे, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, संतोष वंडकर, अशोक खंडागळे, नामदेव गौरवले यांचेसह दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा