Breaking News

 

 

कोणत्याही नेत्याच्या पाया पडायचे नाही – अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणात नेत्यांचे पाय धरण्याची पंरपरा अनेक नेते आणि कार्यकर्ते जपताना दिसतात. अनेकदा आमदार, खासदार आणि मंत्री देखील आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसतात. पण अजित पवार यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या अजिबात पाया पडायचे नाही असे संगितले आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून अनेक नेते मंडळी प्रचारासाठी विविध मतदार संघ पिंजून काढत आहेत. या निमित्ताने नेतेमंडळी मनमोकळेपणाने मतदारांशी संवाद साधत आहेत.  अजित पवार यांची नुकतीच माढा मतदार संघात सभा झाली. यावेळी त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे सांगताना कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या अजिबात पाया पडायचे नाही असा कानमंत्र दिला आहे.

‘या नेत्याच्या पाया पड, त्या नेत्याच्या पाया पड’ असा माढा मतदार संघातील इतिहास होता. यापुढे कोणत्याही नेत्यांच्या पाया पडायचे नाही असे अजित पवार यांनी थेट सांगून टाकले.  यावेळी अजित पवार यांनी आई-बापाच्या पाया पडा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देत मोहिते पाटील कुटुंबाला टोला लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash