महावीर एज्युकेशनच्या आंतरराष्ट्रीय स्कूलचे आज भूमिपूजन 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या महावीर एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध शैक्षणिक संस्थांचे आगर असलेल्या पाचगाव – गिरगाव रोड या ठिकाणी नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक खुर्ची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली. ‘सीबीएसई’सह पूर्व प्राथमिक-प्राथमिक-माध्यमिक-उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व प्रकारच्या क्रीडाप्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा व प्रशिक्षणाची सुविधाही देण्यात येणार आहे असेही गांधी यांनी सांगितले.

आज (शनिवार) रोजी दुपारी चार वाजता पाचगाव-गिरगाव रोडवरील आश्रम शाळेशेजारी भूमिपूजन व पायाभरणी समारंभ होणार आहे. या प्रसंगी ‘क्रीडाई’ महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारेख, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, जि. प. सदस्य सौ. मनीषा टोणपे क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष   विद्यानंद बेडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य महावीर गाट, सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले, हुपरीच्या उपनगराध्यक्षा सौ. जयश्री गाट, शिक्षण संस्था संघाचे जयंत असगावकर, भरत रसाळे, शिवाजी कोरवी, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, बाबासाहेब पाटील, गिरगावच्या सरपंच संध्या पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गांधी यांनी केले आहे.

One thought on “महावीर एज्युकेशनच्या आंतरराष्ट्रीय स्कूलचे आज भूमिपूजन ”

  1. गांधी परिवार को हार्दिक बधाई व शुभकामनाएं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram