कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. बँकेच्या १४ अधिकाऱ्यांना उपव्यवस्थापकपदी बढती झाल्याचे आदेश देण्यात आले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कार्यकारी समिती बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना आदेशांचे वाटप झाले.

या अधिकाऱ्यांमध्ये शेती कर्ज विभागाचे चंद्रकांत रावण, गिरीश पाटील, रवी शिंगे, शिवाजी आडनाईक. व्यक्तिगत कर्ज विभागाचे सुनील लाड, अकाउंट्स बँकिंगचे शिवाजी घोरपडे, आप्पासाहेब वाळके, सुरेश काकडे, प्रशासनचे सुनील वरुटे,  राजेंद्र सावंत, कायदा व सल्लाचे नरसाप्पा आलासे, ऑडिटचे गिरीश माळी, वसुलीचे राजकुमार पाटील आणि मार्केटिंग प्रोसेसिंग विभागाचे अल्ताफ मुजावर यांचा समावेश आहे.

यावेळी आ. राजेश पाटील, आ. डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार निवेदिता माने, ए. वाय पाटील, प्रताप ऊर्फ भैया माने, संतोष पाटील, स्मिता गवळी, श्रुतिका काटकर आदी संचालक, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बँकेचे अध्यक्ष आ. मुश्रीफ म्हणाले, केडीसीसी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रस्थानी म्हणून सेवा करा. दैनंदिन कामकाजातून उत्तरोत्तर या बँकेचा नावलौकिक वाढवणे आवश्यक आहे.