Breaking News

 

 

कोल्हापुरात सोमवारपासून पदपथावरील अतिक्रमण हटाव मोहीम

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  पदपथावरील अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण विभाग व चारही विभागीय कार्यालयातर्फे सोमवारपासून कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती, महापालिका प्रशासनाने आज (शुक्रवार) स्थायी समितीच्या सभेत देण्यात आली. शारंगधर देशमुख अध्यक्षस्थानी होते.

शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर स्क्रॅप वाहने महिनोंमहिने पडून आहेत. अश्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर वाहतूक पोलीस व महापालिकेतर्फे अशा वाहनांवर कारवाई सुरु असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. टाकाळा खण स्वच्छता मोहीम का थांबवली, असा प्रश्न सौ. सविता भालकर यांनी उपस्थित केला. त्यावर वॉर्ड ऑफिसकडील कर्मचारी निवडणूक कामासाठी दिले होते. ते आता उपलब्ध झाल्याने सोमवारपासून स्वच्छता मोहीमेला सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.

शहरातील सिग्नलवर झाडांच्या फांद्या आल्याने सिग्नल दिसत नाहीत. तसेच रोड डिव्हाडरवरील शोभेच्या झाडांचे कटिंग करुन त्याला पाणी घालावे, अशा सुचना सदस्यांनी केली. पदपथावरील अतिक्रमणांचा प्रश्न सौ. पूजा नाईकनवरे यांनी उपस्थित केला. नाले सफाईचे काम १५ मार्चपासून सुरु केले असून टप्प्याटप्प्याने ते पूर्ण करण्यात येईल. या कामासाठी पोकलँड उपलब्ध करुन दिला असून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. शाहुपुरी येथील गाडी अड्ड्यातील वाहनतळासाठी निविदा मागवण्यात आल्याचा खुलासाही प्रशासनाने केला.

या सभेत दिपा मगदूम, राजाराम गायकवाड, गीता गुरव, माधुरी लाड, संजय मोहिते आदींनी प्रश्न उपस्थित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे