कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जनसंघर्ष सेनेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कोल्हापुरातील युवक- युवतींसाठी स्टडीस्पेस उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून साकारलेल्याचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जनसंघर्ष सेनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभ्यासिकेचे उद्घाटन शाहूवाडी विभागाचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळोखे, महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, जिल्हा विशेष शाखा मधुरिमाराजे छत्रपती, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, ॲड. गुलाबराव घोरपडे, सूर्यकांत पाटील, विक्रम जरग, अभिजित तायशेटे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले  जनसंघर्ष सेना राजर्षी शाहू अभ्यासिका, दत्तसाई संकुल, जयप्रकाश नारायण उद्यान शेजारी, बागल चौक परिसर येथे सर्वांसाठी सुरु करण्यात आली आहे. जनसंघर्षचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी, सर्व  पदाधिकारी, माजी उपमहपौर अर्जुन माने आदी उपस्थित होते.