Breaking News

 

 

प्रा. मंडलिकांसमोर केवळ विकासाचेच व्हिजन : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचेच व्हिजन डोळ्यासमोर ठेवून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. स्थानिक प्रश्नांची त्यांना जाणीव असल्यामुळे कागल तालुक्याने मोठे मताधिक्य देऊन प्रा. मंडलिकांना विजयी करावे, असे आवाहन म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते आज (शुक्रवार) कसबा सांगाव (ता.कागल) इथल्या जाहिर सभेत बोलत होते.

संजयबाबा घाटगे म्हणाले, प्रा. संजय मंडलिक यांच्या रुपाने बहुजन समाजाचा खासदार संसदेत जाणार आहे. सामान्य माणसाच्या  उत्कर्षासाठी संघर्ष करण्याची ताकद प्रा. मंडलिकांच्यात आहे. स्व. मंडलिकांची विचारधारा पुढे नेण्यासाठी प्रा. मंडलिकांना संसदेत पाठवू या, असे आवाहन केले.

प्रा. मंडलिक म्हणाले, या निवडणूकीत आतापर्यंत सातशे गावांचा दौरा पूर्ण केला आहे. महाडिक प्रवृतीला हद्दपार करण्याचा विडा संपूर्ण जिल्ह्याने उचलला आहे. विरोधी उमेदवाराचा पराभव करण्यात व मला विजयी करण्यात कागल तालुक्याचा सिंहाचा वाटा असणार आहे. जिल्ह्यात कागल तालुका आणि देशात कोल्हापूर जिल्हा अग्रगण्य करण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे सांगिते.

यावेळी अॅड.बाबासाहेब मगदूम, आप्पासाहेब पाटील, प्रकाश पाटील, शंकर पाटील, शिव गोंडपाटील,करणसिंह घाटगे, करनूरचे सरपंच लक्ष्मण भंडारे, सचिन घोरपडे, आनंदा पाटील, तानाजी कुंभार, बाळासाहेब पाटील, शेंडूरचे सरपंच शिवाजीराव कासोटे यांच्यासहीत मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे