Breaking News

 

 

पन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी…                         

कोतोली (प्रतिनिधी) :  पन्हाळ्यासह परिसरात आज (शुक्रवार) सायंकाळी पाचच्या सुमारास  विजांच्या कडकडाटासह  अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसऴल्या. सुमारे तासभर ऊन-पावसाचा खेळ चालू होता. यावेळी परिसरातल्या अबालवृद्ध आणि हौशी पर्यटकांनी या पावसात चिंब भिजण्याचा आनंद घेतला. 

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. पाडव्याच्या पूर्व संध्येला अचानक आलेल्या या पावसाने उघड्यावर असलेले सरपण आणि जनावरांचा चारा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग