Breaking News

 

 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हातकणंगले तालुक्यात अनोखा फंडा…

हातकणंगले (प्रतिनिधी) : मतदानाचा टक्का वाढावण्यासाठी हातकणंगले तालुक्यात बहुतांशी गावांमध्ये मतदान जनजागृतीची मोहीम राबवली जात आहे. यामध्ये शाहिरांमार्फत मतदानाचे महत्व या विषयांवरील पोवाडे सादर केली जात असल्याची माहीती, हातकणंगलेचे तहसिलदार सुधाकर भोसले यांनी दिली.

शिरोली, हेर्ले, आतिग्रे, रुकडी, हातकणंगले, आळते, वाठार, पारगांव, रुई या गावांसह बहुतांशी गावांमध्ये ही मतदान जनजागृती पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे. यासाठी हे शाहीरांचे पथक दररोज चार  गावांमध्ये या पोवाडाचे सादरीकरण करणार आहेत. शाहिर आपल्या भाषा शैलीमध्ये पोवाडयाच्या माध्यमातून मतदाना विषयी लोकांच्यात जनजागृती करीत आहेत.

अशा या अनोख्या पध्दतीमुळे या पथकाची चर्चा मात्र जोरात आहे. काहीही करून मतदानाचा टक्का वाढविणे, हाच संकल्प निवडणूक आयोगाने केला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash