Breaking News

 

 

प्रभाग समिती सभापतींची निवड १५ एप्रिलला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतींची निवड १५ एप्रिल (सोमवार) रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमल मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष सभेत या निवडी होणार आहेत. महापालिकेच्या छ. ताराराणी सभागृहात या निवडी होणार आहेत.

महापालिकेच्या छ. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय प्रभाग समिती, गांधी मैदान विभागीय कार्यालय प्रभाग समिती, बागल मार्केट विभागीय कार्यालय प्रभाग समिती आणि ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय प्रभाग समितींच्या सभापतींची निवड या दिवशी होणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार मुंबई नगरविकास विभाग आणि विभागीय आयु्क्त पुणे यांच्या आदेशानुसार या निवडी होणार आहेत.

सभापती पदासाठी ११ एप्रिल पर्यंत दुपारी ३ ते ५ या वेळेत नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा