Breaking News

 

 

खा. शेट्टींनी विशिष्ट जातीसाठी राजकारण केले : सदाभाऊ खोत

टोप (प्रतिनिधी) : मी शेतकऱ्यांना दर दिला म्हणणाऱ्यांनो त्यावेळी आम्हीही आंदोलनात होतो. त्यामुळे कोणी फक्त माझ्यामुळे दर मिळाला असे म्हणू नये. एका विशिष्ट जातीसाठी राजकारण करणाऱ्या विद्यमान खा. राजू शेट्टी यांना पराभूत करा, असे आवाहन कृषी  मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. ते पुलाची शिरोलीत धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत बोलत होते. सरपंच शशिकांत खवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, खा. शेट्टी यांनी प्रत्येक निवडणुकीत बहुजन समाजाचा वापर करून घेतला. पण उमेदवारी देताना बहुजन समाजाला वंचित ठेवले. ऊस, दूधदरवाढीसाठी आंदोलन करून विद्यमान खासदारांकडून  शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दर जाहीर करीत त्यांचे आंदोलन मोडीत काढले. भविष्यात ऊस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही याची काळजी फडणवीस सरकारने घेतली असल्याचे खोत यांनी सांगितले.

तसेच आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याच धर्तीवर धनगर व मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्यात येणार आहे. मी मतदारसंघात २२५ कोटींचा विकास निधी दिला आहे. तुम्ही विकासनिधी किती आणला आणि कुणाला दिला हेही एकदा जाहीर करावे, असे आव्हानही खोत यांनी शेट्टी यांना दिले.

यावेळी माजी खा. निवेदिता माने, आ. सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, शिवसेना तालुका प्रमुख बाजीराव पाटील, वडगांव बाजार समिती सदस्य सुरेश पाटील, उपसरपंच सुरेश यादव, सतीश पाटील, अनिल खवरे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग