Breaking News

 

 

लोकसभा निवडणूक लढविणार नाही : सुमित्रा महाजन

इंदूर (वृत्तसंस्था) : सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष आणि इंदूरच्या विद्यमान खासदार सुमित्रा महाजन यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. सुमित्रा महाजन यांनी आज (शुक्रवार) याबाबत अधिकृत पत्रक प्रसिद्ध  केले आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यापाठोपाठ वरिष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची पत्ता कापल्याची चर्चा पक्षात दबक्या आवाजात सुरू आहे.

मध्यप्रदेशमधील इंदूर वगळता सर्व जागांवर भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सुमित्रा महाजन यांना पुन्हा संधी मिळणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू होती. आपलाही पत्ता कट होणार नाही, याचा अंदाज आल्याने अखेर सुमित्रा महाजन यांनीच लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. त्याचवेळेस पक्षाने अजून इंदूरमधून उमेदवार का जाहीर केलेला नाही? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

१९८४-८५ दरम्यान इंदूर शहराच्या उपमहापौर पदावर राहिलेल्या महाजन १९८९ सालापासून इंदूर मतदारसंघामधून सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत व सध्या सर्वाधिक काळ लोकसभा सदस्य राहिलेल्या महिला आहेत. त्या सध्या ७६ वर्षांच्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश