शाहरुख खानला लंडन विद्यापीठाची ‘मानद’ पदवी…

लंडन (वृत्तसंस्था) : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान म्हणजेच किंग खानला आजवर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता लंडनमधल्या विद्यापीठाने शाहरूखला मानद पदवी देऊन गौरवले आहे. ‘द युनिव्हर्सिटी ऑफ लॉ’ कडून त्याला लोककल्याण विषयातील पदवी प्रदान करण्यात आली. सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा दीक्षांतसोहळा पार पडला.

शाहरुखने मानवी हक्क, न्याय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यानं या कार्यात मोलाचं योगदान दिले होते. म्हणूनच लोककल्याण विषयातील पदवी शाहरुख खानला आम्ही प्रदान करत असल्याचं विद्यापीठानं ट्विट करत म्हटले आहे. शाहरूख खान ‘मीर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे महिलांचे सबलीकरण, त्यांचे पुनर्वसन आणि मानवी हक्कांसाठी काम करतो आहे. ही पदवीचा स्विकार करत शाहरूखने समस्त विद्यार्थी, विद्यापीठाचे आभारही मानले.

तसेच कोणतीही मदत आणि दान हे गाजावाजा न करता शांततेत करावे, यातच दातृत्वाचा शुद्ध हेतू दिसून येतो. प्रसिद्धी करून केलेल्या दानाला काहीही अर्थ नसतो असं मी मानतो. मी नेहमीच महिला सबलीकरण आणि वंचितांच्या हक्कांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे शाहरूख खानने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram