Breaking News

 

 

निवडणूक आयोगाबद्दल आक्षेपार्ह विधान : प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हा…

मुंबई (प्रतिनिधी) :  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. यवतमाळ येथे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत पुलवामा घटनेबद्दल बोलण्यास मनाई करणाऱ्या निवडणूक आयोगाला आमची सत्ता आल्यास दोन दिवस कारागृहात टाकू, असे आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

यवतमाळच्या दिग्रस येथे पुलवामा हल्ल्यात ४० सैनिक गमावल्यानंतरही बेजबाबदार पंतप्रधान मोदींना पुन्हा सत्ता देणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत आम्हाला न बोलण्याचे निवडणूक आयोगाकडून कसे सांगू शकते ? आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आम्ही जर सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला दोन दिवसांसाठी जेलमध्ये टाकू, असे त्यांनी म्हटले होते.

या विधानानंतर त्यांच्या विरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये कलम ५०३, ५०६, १८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आंबेडकरांनी माझ्या निवडणूक आयोगाच्या विधानाला मुद्दा बनवले जात असल्याचेही म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे