Breaking News

 

 

योगी आदित्यनाथांना ‘देशद्रोही’ म्हणाला भाजपचाच नेता…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना माजी लष्करप्रमुख आणि सध्या केंद्रीय मंत्री जनरल व्ही.के.सिंग घरचा आहेर दिला आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत सिंग यांनी मांडले आहे. इतकेच नाही तर अशा प्रकारे सेनेचा अपमान करणारे देशद्रोही असल्याचेही सिंग म्हणाले आहेत.

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी सिंग यांच्या मुलाखतीचा एक व्हिडाओ आपल्या अकाऊण्टवरून ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये सिंग यांनी लष्कराला मोदींची सेना म्हणणाऱ्या आदित्यनाथ यांच्यावर टीका केल्याचे दिसत आहे. ‘जर कोणी भारतीय सेना ही मोदींची सेना आहे असं म्हणत असेल तर ते केवळ चुकीचं नाही तर असं म्हणणारा देशद्रोही आहे,’ असं सिंग या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात.

पटेल यांनी हा व्हिडीओ ट्विट करत भाजपा अशा देशद्रोह्यांवर कारवाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय लष्कर हे ‘मोदी यांची सेना’ आहे, असे बेताल वक्तव्य आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री गाझियाबाद येथे जाहीर प्रचार सभेत केले होते. दहशतवादाला आळा घालण्यात विरोधक अपयशी ठरल्याची टीका करण्याच्या भरात त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यातच आता त्यांच्या टिकाकारांमध्ये सिंग यांच्या रुपात स्वपक्षीय नेत्यांचीही भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा