Breaking News

 

 

टोप गावात चोरट्यांचा धुमाकूळ : पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता हातकणंगले ) येथे काल (बुधवार) रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये इंडिया बँकेचे एटीएम मशीन, तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. तर शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये गोडावून ऑफिसचे कुलूप तोडून चार फुटांचे कपाट उचलून चोरट्यांनी पोबारा केला. या चोरीची माहिती शिरोली पोलिसाना समजताच घटनास्थळी धाव घेवून घटनेची पाहणी करून श्वान आणि ठसे तज्ञास पाचारण करण्यात आले होते.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, टोप गावातील दत्त मंदीर रस्त्यावर असणाऱ्या इंडिया बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये  काल  बँकेच्या कर्मचाऱ्य़ांनी पैशाचा भरणा केला होता. याची माहीती चोरट्यांना लागली असल्याने हे मशीन लोखंडी कटावनीच्या साहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला. पण वेळेवर गावकऱ्यांच्या सतर्कतेने चोरांनी कटावनी एटीएम मशीनच्या मागील बाजूस टाकून पळ काढला.

हा चोरीचा प्रयत्न फसल्यावर चोरट्यांनी टोप गावची वाढीव वसाहतीतील दक्षिणवाडी येथे आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी एक फार्म हाऊस फोडून काही मिळते का पाहिले. पण काहीच मिळाले नसल्याने त्यांनी त्या ठिकाणी मद्यपान केले. घटनास्थळी मद्याच्या बाटल्या व ग्लास आढळून आले.

फार्म हाऊसपासून दोनशे फुटांवर गुरव समाजाची वस्ती असून या वस्तीमध्ये घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा मोबाईल तर घराच्या खिडकीतून काठीला काठी बांधून कडी काढून घरामध्ये प्रवेश केला.  कपाटाचे ड्रॉवर काढताना झालेल्या आवाजाने घरातील लोक जागे झाल्यावर चोरट्यांनी हायवेच्या दिशेने पळ काढला. नागरिक आपल्या पाठीमागे लागतील या भितीने चोरट्यांनी त्यांच्यावर दगड फेक केली. यामुळे नागरिकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गवर गांधी फार्म हाऊस शेजारी असणाऱ्या कुकुट पालन खाद्य गोडावूनच्या ऑफिसचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील कागपत्रे विस्कटून चार फुटांचे कपाट आणि लॅपटॉप घेवून पोबारा केला. हे कपाट वजनाने जड असल्याने एकट्या-दुकट्या चोरट्याचे काम नसून ते दहा ते बाराजण असल्याचा अंदाज वर्तवता जात आहे.

या चोरींचा छडा लावण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी आले. या श्वानाने घटनास्थळापासून एक किलोमीटर पर्यंतचा मार्ग  दाखवला. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे