Breaking News

 

 

भाजपचा नारायण राणेंना धक्का : विनायक राऊत यांना देणार साथ !

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विनायक राऊत यांना असलेला भाजपच्या कार्यकर्त्यांचा विरोध अखेर वरिष्ठ नेत्यांच्या समजावणीमुळे मावळला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र मेळावा घेऊन अखेर राऊत यांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राऊत यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी हा नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाला धक्का मानला जात आहे.

या मतदारसंघात मागील तीन वर्षांपासून शिवसेना-भाजपमधील मतभेद वाढले होते. त्यातच नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपला समर्थन दिले, खासदारकीही मिळवली. त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी राऊत यांच्या उमेदवारीला उघड विरोध तर केलाच आणि प्रचार करण्यास नकारही दिला होता. या मतदारसंघात स्वाभिमान पक्षाकडून माजी खासदार निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीचेही आव्हान आहे. त्यामुळे राऊत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या.

अखेर विनायक राउतांना यांच्या विरोधाचं रणशिंग फुंकणाऱ्या सिंधुदुर्ग भाजपालाच  अखेर वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे  मतभेद बाजूला ठेवून राऊतांच्या प्रचारासाठी मेळावा घ्यावा लागला. निवडणुकीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच झालेल्या भाजपाच्या या समर्थन मेळाव्यात हजेरी लावणाऱ्या विनायक राऊतांनीही चार वर्षात झालेल्या आपल्या चुका पदरात घ्या असं भावनिक आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्याना केलंय.

विनायक राऊत म्हणाले, सामूहिकरीत्या बसून सुद्धा तक्रारी जाणून घेतल्या आहेत. साहजिक आहे की आपण एकत्र लढल्यानंतर त्याच प्रकारची वागणूक आपल्याला मिळाली पाहिजे. दुर्दैवाने मागच्या चार साडेचार वर्षात जे राजकीय वातावरण होतं त्यामुळे ते कदाचित होऊ शकलं नाही. पण यापुढे अशा चुका होणार नाहीत. विनायक राऊतांना मत म्हणजे नरेंद्र मोदीना मत असं कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांनी केला असला, तरी दुसरीकडे नारायण राणेंच्या स्वभिमान पक्षानेही  या आधीच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीनाच आपला पाठिंबा जाहीर केलाय. पण राणेंचा पक्ष आता एनडित नसल्याचं भाजपा नेते सांगत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग