Breaking News

 

 

कोल्हापुरात भाजपच्या कार्यकर्त्यांंनाही कारणे दाखवा नोटिसा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार न करता महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पक्षांतर्गत कारवाई असल्याचे सांगत त्याबाबत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

महाआघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांचा प्रचार करण्याऐवजी  राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, नगरसेवक महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात मग्न आहेत. पक्षातर्फे त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी भूमिका न बदलल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्याचे पाऊल उचलले. माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांच्यासह अन्य काही जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

विरोधी पक्षाने केलेल्या कारवाई प्रमाणेच भाजपनेही पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी काही जण उघडपणे महाआघाडीच्या उमेदवारचा प्रचार करत आहेत. त्यामुळे पक्षाने त्यांना नोटीसा बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे. खुलासा दिला नाही तर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा या नोटीसीत दिला आहे. पक्षाकडून या बाबत गुप्तता बाळगण्यात येत असून कोणाला व किती जणांना नोटीसा दिल्या हे सांगण्यास मात्र नकार देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा