Breaking News

 

 

महापालिकेतर्फे मंगळवारी भव्य मानवी रांगोळी : आयुक्त

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध शाळांमधील ५००० विद्यार्थ्यांच्या सहभागाने ‘देश का महा त्योहार’ अंतर्गत मंगळवारी (दि. ९) भव्य मानवी रांगोळीचे आयोजन केले आहे. गांधी मैदानात सकाळी ०७:३० वा. हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. एम.एस.कलशेट्टी यांनी आज (गुरुवार) दिली.

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने लोकशाही बळकटी करणासाठी १०० टक्के मतदान करण्यासंबंधी मतदारांमध्ये जनजागृती या उपक्रमातून केली जाणार आहे. यावेळी मी मतदान करणार असल्याबाबत मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबविणेत येणार आहे.

या कार्यक्रमच्या नियोजनासाठी सहभागी शाळा, मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांची बैठक कोल्हापूर हायस्कूल येथे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला उपायुक्त मंगेश शिंदे, नायब तहसिलदार प्रकाश दगडे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, विस्तार अधिकारी ओतारी, प्रशासनाधिकारी शंकर यादव, सहा. नोडल अधिकारी डी.एस. तळप, मुख्याध्यापक हिरेमठ, जगदिश ठोंबरे उपस्थित होते.

रांगोळीसाठी उपस्थित विद्यार्थ्यांना खाउ वाटप, पिण्याचे पाणी सोय, ऍ़म्ब्युलन्स सुविधा इ. सोयी महापालिकेमार्फत पुरविणेत येणार आहेत.  मानवी रांगोळी साकारणेसाठी सहा. नोडल अधिकारी डी.एस. तळप, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, नागेश हंकारे, राजेंद्र बनसोडे, विकास माळी, रितेश माने, रमजान मुल्ला, प्रशांत जाधव, संजय वाडकर, शैलेश कांबळे, शांताराम सुतार इ. परिश्रम घेत आहेत. मतदार जागृतीसाठी पथनाटय, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रॅली, पोवाडा, मानवी साखळी इ. सारखे विविध उपक्रम कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचेमार्फत आयोजित करुन मतदान टक्का वाढविणेसाठी जनजागृती करणेत येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

 

क्रीडा