कळे (प्रतिनिधी) : शैक्षणिक संस्थाचालकांनी  विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहावे, असे आवाहन पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद जरंडीकर यांनी केले. ते संस्थेच्या नूतन कार्यालयाचे व वेबसाईटच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जरंडीकर म्हणाले, १९३८ साली पन्हाळा तालुक्यातील तत्कालीन शैक्षणिक गरज ओळखून पन्हाळा एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्थाचालकांनी त्याग केला आहे. किंबहुना त्यागातूनच संस्था उभी राहिलेली आहे. आजही संस्थाचालक संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याग करत आहेत, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.

संस्थेच्या वेबसाईटची माहिती संस्थेच्या प्राथमिक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय लाड यांनी दिली. गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष गिरीश नानिवडेकर, उपाध्यक्ष माधव गुळवणी, सचिव पी. ए. यज्ञोपवीत, सदस्य आर. के. कुलकर्णी, संस्थेच्या प्राथमिक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष अक्षय लाड, सदस्य अनंत मोघे, विनायक गोलिवडेकर, पन्हाळा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका व्ही. पी. जमदग्नी, कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक एस.जी. गुरव, पर्यवेक्षक ए. बी. गायकवाडज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख साहित्यिक  प्रा. कृष्णात खोत  यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.