Breaking News

 

 

खुशखबर : गृह, वाहन कर्जावरील व्याजदरात होणार कपात !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य कर्जदारांना रिझर्व्ह बँकेने काही प्रमाणात दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) अपेक्षेप्रमाणे रेपो दरात पाव टक्के कपात केली. यामुळे आगामी काळात गृह, वाहनसह इतर सर्व प्रकारची कर्जांच्या व्याजदरात कपात होणार आहेत. तसेच गृह कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या मासिक हप्त्याच्या रकमेमध्ये घट होणार आहे.

२०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळं आगामी काळात गृह, वाहन अथवा अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत. तसंच ज्यांनी गृहकर्ज घेतलंय, त्यांच्या ईएमआयमध्ये घट होण्याची शक्यता आहे.  समितीनं रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी कपातीचं समर्थन केलं. तसंच या वर्षात आर्थिक विकास दर ७ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे