Breaking News

 

 

‘बीएसएनएल’मधून ५४ हजार कर्मचाऱ्यांची सक्तीची स्वेच्छानिवृत्ती ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या बीएसएनएलला रुळावर आणण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षाची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच बीएसएनएलने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे ५४ हजार कर्मचाऱ्यांची बीएसएनएलमधून सुट्टी करण्यात येणार आहे. 

बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार करण्यात आली आहे. हा प्रस्ताव येत्या एक-दोन दिवसांतच केंद्रीय मंत्रिडळाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी  निवडणूक आयोगाची परवानगी घेण्यात येणार असल्याच बीएसएनएलच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सध्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वय ६० वर्ष आहे. त्यात दोन वर्षाची कपात करून ते ५८ एवढ करण्यात येणार आहे. व्हीआरएस आणि निवृत्ती वयातील कपातीमुळे बीएसएनएलमधील एकूण ५४ हजार ४५१ कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार असल्याच या अधिकाऱ्याने सांगितल आहे.

बीएसएनएलमध्ये १.७६ लाख कर्मचारी आहेत. तर एमटीएनएलमध्ये २२ हजार कर्मचारी आहेत. येत्या पाच-सहा वर्षात एमटीएनएलमधील १६ हजार आणि बीएसएनएलमधील ५० टक्के कर्मचारी निवृत्त होणार असल्याच सांगण्यात येत आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलमधील स्वेच्छा निवृत्तीमुळे अनुक्रमे ६, ३६५ कोटी आणि २, १२० कोटींची बचत होणार आहे. विशेष म्हणजे ही स्वेच्छानिवृत्ती योजना गुजरात मॉडेलच्या धर्तीवर बनिवण्यात आली आहे. गुजरातमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण करण्यात आलेल्या प्रत्येक सेवा वर्षासाठी ३५ दिवसाचे वेतन तसेच निवृत्तीपर्यंत राहिलेल्या वर्षांसाठी २५ दिवसाचे वेतन देण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे