Breaking News

 

 

इस्रो पाच लष्करी उपग्रह प्रक्षेपित करणार…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंतराळात भारताचे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या वर्षात पाच लष्करी उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. याची तयारीही सुरु झाली आहे. नुकतेच इस्रोने दोन टेहळणी उपग्रह अवकाशात सोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. या उपग्रहांमुळे सुरक्षा रक्षकांची निरिक्षण क्षमतेत वाढ होणार आहे. यासाठी आणखी अत्याधुनिक सैन्य उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहेत.

इस्रो नव्या मालिकेतील चार रिसॅट उपग्रह आणि एक अॅडव्हान्स कार्टोसॅट-३ उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या हालचालींमध्ये झालेली वाढ यामुळे इस्रोचा दृष्टीकोन बदलला आहे. आता इस्रोने आपले संपूर्ण लक्ष्य अंतराळात भारताला सक्षम बनवण्यावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी, आम्ही यंदा उपग्रह आणि रॉकेट्स मिळून ३३ मोहिमा पार पाडण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा