‘शॉर्टकट टू इंग्लिश’मुळे घरबसल्या इंग्रजी शिकणे शक्य : किरण परांडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरबसल्या सोप्या पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकणे ‘शॉर्टकट टू इंग्लिश’ या पुस्तकामध्ये शक्य असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक किरण परांडेकर यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.

जागतिकीकरणाच्या व स्पर्धेच्या जगात उत्तम करिअर व जगाशी जोडण्यासाठी इंग्रजी मध्ये बोलता येणे महत्वाचे आहे. मात्र भाषा शिकण्यासाठी फारसे कोणी गांभीर्याने प्रयत्न करीत नाही. भाषा कंटाळवाणी, अवघड आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी चांगल्या करिअरच्या संधीवर तडजोड करावी लागते.  इंग्रजी भाषा ही व्याकरणाचे नियम व त्याच नियमांना अपवाद अशा मिश्रणाने बनली आहे. इंग्रजी भाषा हि एक संवादाचे माध्यम आहे. मातृभाषा शिकताना प्रारंभी व्याकरणाचा विचार केला जात नाही. तसेच इंग्रजी भाषा शिकल्यास लवकर बोलता येऊ शकते असेहि परांडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram