कागल (प्रतिनिधी) : येथे राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान करण्यात आले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत ऊर्फ बॉबी माने, युवराज पाटील, सतीश पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू फोर्सचे संस्थापक विकास चव्हाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडे हे साहित्य प्रदान केले.

गेली चार वर्षे करनूरसह परिसरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नागरिकांना मदत केली जात आहे; मात्र सुरक्षा साहित्यअभावी या कार्यकर्त्यांची गैरसोय  होत होती. याबाबत त्यांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याची दखल घेत हे साहित्य तातडीने पुरवले. यामध्ये तीन लाईफबॉय रिंग, पाच लाईफ जॅकेट, दोन सर्पकाठी व रोप अशा साहित्याचा समावेश आहे.

यावेळी रेस्क्यू फोर्सचे अनिल ढोले, राहुल कोरे, मिलिंद मोपगार, प्रमोद चौगुले, प्रवीण पाटील, वैभव पाटील,  आनंदा पाटील, कृष्णात धनगर, आप्पासो कदम, सुनील गुदले, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, संभाजी चव्हाण, के. बी. चव्हाण, जयपाल चौगुले, शरद चौगुले, किरण गुदले, कलाप्पा कोरे, अमोल खोत, संभाजी चव्हाण आदी उपस्थित होते.