नदीच्या प्रवाहाप्रमाणे आपली वाटचाल उज्ज्वल करा : डी. बी. पाटील

बाजारभोगाव (प्रतिनिधी) : एका नदीचे पाणी दुसऱ्या नदीला जर मिळालं तरच मोठी  नदी होते.या नदीच्या प्रवाहप्रमाणे  विद्यार्थ्यानी आपली वाटचाल उज्जल  करावी असे मार्गदर्शन  करुन मुख्याध्यापक.डी.बी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

काळजवडे (ता. पन्हाळा)  केंद्रशाळा काळजवडे शाळेच्या निरोप समारंभप्रंसगी पाटील बोलत होते. समारंभास नूतन सरपंच शामराव पाटील, अध्यक्षस्थानी विलास सुतार होते. विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.त्यानंतर विनय कोरे हायस्कूलचे सहा-शिक्षक हिंदुराव डोंब यांनी वक्तृत्वातून विद्यार्थ्यांची मने जिंकली.

नूतन सरपंच शामराव पाटील यांनी शाळेला काही मदत लागेल ते देण्याचं आश्वासन दिले.  दिगोळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास रासू  पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram