कागल (प्रतिनिधी) : अतिवृष्टी आणि पुरामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १३ हजार ६००  रुपये म्हणजेच दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भरपाईची कमाल या मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्याबद्दल या दिलासजनाक निर्णयाबद्दल जिल्हा भाजपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अभिनंदन केले आहे.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकाने शेतकऱ्यांची केवळ थट्टा केली. मागील वर्षी कागल विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. योग्य नियोजनाअभावी काही तालुक्यातून पूरग्रस्त निधी परत गेला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. आत्ता शिंदे-फडणवीस सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिंदे सरकारने ओबीसी आरक्षण, पेट्रोल-डिझेलचे दरवाढ कमी करण्याचा, प्रोत्साहन अनुदानातील जाचक अटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे. आजपर्यंत एनडीआरएफच्या माध्यमातून हेक्‍टरी सहा हजार आठशे रुपये मदत देण्यात येत होती. ती थेट दुप्पट करण्यात आली आहे. तसेच पात्र ठरविण्यात आलेल्या जमिनीच्या क्षेत्रात वाढ केल्याने तीन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, असे घाटगे यांनी म्हटले आहे.