Breaking News

 

 

अभिनेत्री रुही सिंहचा दारु पिऊन धिंगाणा…

मुंबई (प्रतिनिधी) :  टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल रुही सिंहने काल (सोमवार) रात्री उशीरा दारुच्या नशेत वांद्रे येथील एका हॉटेलच्या बाहेर धिंगाणा घातला. तर मद्यधुंद झालेल्या रुहीने बाहेर उभ्या असलेल्या सात गाड्यांना धडक दिली. तसेच पोलीसाच्या कानशिलातही लगावली.

मॉडेल रुही सिंहने वांद्रे येथे हॉटेलच्या बाहेर दारु पिऊन धिंगाणा घातला. यावेळी तिला समजावण्यासाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा मोबाइल हिसकावून त्याच्या कानशिलातही लगावली. या प्रकरणी रुही सिंह आणि तिच्यासोबत असलेल्या मित्रांविरोधात मद्यपान करून गाडी चालवणे, पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या प्रयत्न करणे, या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे