Breaking News

 

 

रविंद्र बोडके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार…

धामोड (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील श्री भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था म्हारूळ यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार राधानगरी तालुक्यातील कोतेपैकी खामकरवाडी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र बोडके यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहीर विजय जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीचे जेष्ठ साहित्यिक प्रल्हाद कुलकर्णी होते.

क्रिडा, शेती, आरोग्य, शिक्षण,समाजकार्य, संगीत आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या संस्थेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. शाहू स्मारक दसरा चौक येथे हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. आरोग्य साहित्यिका राजश्री पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी बोडके म्हणाले, आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्याची ही पोचपावती आहे. या पुरस्काराने आणखीन योग्य कार्य करण्याची ऊर्जा मिळणार असल्याचे सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा

गुन्हे